शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या; नाव न घेता उद्धव ठाकरेंचा आनंद महिंद्रांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 22:15 IST

Maharashtra Lockdown: उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देगेल्या दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी  राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. (Maharashtra Lockdown: Uddhav Thackeray slams Anand Mahindra on Lockdown, Corona Virus)

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी  राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

"काही उद्योगपती म्हणतात की आरोग्य यंत्रणा वाढवण्यासाठी भर द्या. हॉस्पिटल उभारा. मात्र, नुसते फर्निचर उभे करून काय उपयोग? त्यासाठी डॉक्टर नकोत का? काही उद्योगपती हा सल्ला देत आहेत. त्यांना मी सांगतो, तुम्ही ५० डॉक्टर द्या, आपण तेही करू", असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.  

काय म्हणाले होते आनंद महिंद्रा?लॉकडाऊनच्या मुद्द्यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे.  'उद्धवजी, समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया', असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी  ट्विट करत  ठाकरे सरकारला दिला आहे.

( परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलोय - मुख्यंमत्री)

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :-- पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही - राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार - लॉकडाऊन करणार का? याचं उत्तर मी अजून देणार नाही- रस्त्यांवर उतरा, पण नागरिकांच्या मदतीसाठी, विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला- लॉकडाऊनबाबत सल्ला देणाऱ्या उद्योगपतीलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला- विरोधी पक्षाच्या लॉकडाऊनबाबतच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांची टीका- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सात कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय- कोरोना काळात राजकारण नको.- सर्वपक्षांनी राज्य सरकारला सहकार्य करावं- रुग्ण वाढ थांबवण्यासाठी सध्या कुठलाही उपाय नाही- लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम- कोरोनाची लस घेतली तरी मास्क अनिवार्य. - अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळाख्यात- मला व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणार- सध्या मुंबईतील रुग्णसंख्या दररोज साडे आठ हजारांवर पोहोचली आहे.- राज्यात एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणार नाही.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnand Mahindraआनंद महिंद्राMaharashtraमहाराष्ट्र