शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
2
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
3
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
4
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
5
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
6
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
7
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
8
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
9
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
10
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
11
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
12
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
13
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा
14
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
15
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
16
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
17
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
18
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
19
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल

आमदारकीसाठीची येट्स दाम्पत्याची धडपड फळाला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 05:40 IST

मंत्रालयात आणि अधिवेशनादरम्यान विधानभवनात येट्स दाम्पत्य वावरताना दिसते. आपल्याला आमदारकीची पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून डेस्मंड कायम धडपडत अन् त्यांच्या पत्नी नीलिमा सावलीसारख्या त्यांच्यासोबत असत.

मुंबई - मंत्रालयात आणि अधिवेशनादरम्यान विधानभवनात येट्स दाम्पत्य वावरताना दिसते. आपल्याला आमदारकीची पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून डेस्मंड कायम धडपडत अन् त्यांच्या पत्नी नीलिमा सावलीसारख्या त्यांच्यासोबत असत. या दाम्पत्याची धडपड आता फळाला आली असून तब्बल १६ वर्षांनंतर डेस्मंड हे पुन्हा एकदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत.

नवे सरकार आल्यानंतर लगेच काही दिवसांत अँग्लो इंडियन आमदार नामनियुक्त होण्याची अपेक्षा असते. पूर्वी तसा प्रघातदेखील होता. मात्र, विद्यमान सरकारने डेस्मंड यांच्या रुपाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर अँग्लो इंडियन सदस्याची जागा भरली आहे. त्यामुळे डेस्मंड यांना दीड वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी त्यांना अँग्लो इंडियन सदस्य म्हणून विधानसभेवर नामनियुक्त केले आहे.आपल्याला आमदारकीची पुन्हा संधी मिळावी म्हणून डेस्मंड यांनी चिकाटीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांना यश मिळाले. डेस्मंड आणि नीलिमा यांची जोडी इतकी पक्की आहे की मागील युती सरकारच्या काळात डेस्मंड जेवढा वेळ विधानसभागृहात बसत तितका वेळ त्या देखील प्रेक्षक दीर्घेत बसून असत.आतापर्यंतचे अँग्लो इंडियन आमदारपी.व्ही.गिलेस्पी, आयरिन लिलियन गिलेस्पी, नॉर्मन रेगिनाल्ड फर्ग्युसन, एम.सी.फर्नांडिस, डेनिस लॉरेन्स इमो, ई.जी.वूडमन, सी.एल. प्राऊडफूट, डेस्मंड येट्स, व्हिक्टर फ्रेट्स हे आतापर्यंतचे महाराष्ट्रातील अँग्लो इंडियन आमदार राहिले आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाMLAआमदारnewsबातम्या