शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

महाराष्ट्र केसरी स्पर्धा: मैदान गमावूनही तो ठरला ‘सिकंदर’! विजयापेक्षा पराभवाचीच चर्चा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:32 IST

मी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की खांद्यावर घेणार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या.” यंदा सिंकदरने पहिल्या फेरीपासून आक्रमक आणि सरस कामगिरी केली. 

उमेश गो. जाधव पुणे : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत मानाची गदा उंचावली. मात्र, या स्पर्धेनंतर खरी चर्चा रंगली ती सिकंदर शेखच्या पराभवाचीच. तो हरला की हरवला गेला, असा संशयाचा सूर सोशल मीडियावर आहे. यावरून मैदान गमावूनही तो ठरला ‘सिकंदर’ असेच चित्र दिसत आहे.

सिकंदरने नुकताच एक व्हिडीओ करून सांगितले की, “मी हरलो की हरवला गेलो याबाबत चर्चा करणे थांबवा. यंदा नाही तर पुढील वर्षी मी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की खांद्यावर घेणार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या.” यंदा सिंकदरने पहिल्या फेरीपासून आक्रमक आणि सरस कामगिरी केली. महेंद्र गायकवाड विरुद्ध किताबाच्या उपांत्य लढतीत पहिल्याच फेरीत सिकंदरने ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, सिकंदरला आतली टांग लावून बाहेर पाडणाऱ्या महेंद्रला चार गुण दिल्याने सिकंदरचा पराभव झाला. 

खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईने जाहीर करण्याचा प्रयत्न का केला? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहेत.  सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा प्रवास रोमहर्षक आहे.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून पोलिसांत तक्रार महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोथरूड येथे शनिवारी झाली. या स्पर्धेतील अंतिम फेरीमधील सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड या कुस्तीमध्ये  मारुती सातव यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले. या कुस्तीतील एका डावामध्ये महेंद्र गायकवाड याला ४ गुण दिले. त्यावर मोठा वाद झाला. त्यानंतर रविवारी दुपारी मारुती सातव यांना संग्राम कांबळे या नावाने एकाचा फोन आला. त्याने मारुती यांना धमकी दिली. हे संभाषण सोशल मीडियावर प्रसारित करून स्वत:च्या रिव्हाॅल्व्हरमध्ये गोळ्या भरत असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला. सातव यांचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत असता तर ती कुस्ती अतिशय रंगतदार झाली असती. उपांत्य लढतीत गुण गमावल्यावरही त्याने पंचांशी हुज्जत घातली नाही. भविष्यात तो नक्कीच गदा उंचावेल. - अमोल बुचडे, रुस्तुम ए हिंद

सिकंदरवर कोणताही अन्याय झालेला नाही. कुस्तीतील नियमांच्या अज्ञानामुळे असे आरोप होत आहेत. सिकंदर धोकादायक स्थितीत पडल्यामुळेच महेंद्रला चार गुण देण्यात आले. अशावेळी दोन नाही तर चार गुण दिले जातात. - पंच समिती, महाराष्ट्र केसरी

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा