गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? किंवा काही निर्बंध घातले जातील का? असे काही प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी सोमवारी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल भाष्य केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. "नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे," असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी Rajesh Tope माध्यमांशी बोलताना केले."राज्यात कोरोनाबाधित होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही," असे टोपे यांनी स्पष्ट केले. संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लवकर लसीकरण पूर्ण करावे"राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे," असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
Rajesh Tope : राज्यात लॉकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:58 IST
Maharashtra health minister Rajesh Tope clarifies about no lockdown should be implemented in state but restrictions will implement : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णांची वाढ
Rajesh Tope : राज्यात लॉकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले....
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णांची वाढ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, आरोग्यमंत्र्यांची माहिती