शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख प्रकरण भोवले; पालकमंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडेंचे नावच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 21:48 IST

Maharashtra Guardian Minister List : अजित पवारांकडे पुण्यासह बीडचे पालकत्व.

Maharashtra Guardian Minister List : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या जिल्ह्याची राज्यभर चर्चा सुरू आहे, त्या बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्याऐवजी, अजित पवारांकडे बीडचे पालकत्व देण्यात आले आहे. बीडसोबतच पवारांकडे पुण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडेंना तीव्र विरोध होत आहे. 

धनंजय मुंडेंना धक्का मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या हत्येचा आरोप धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर असल्यामुळे, विरोधक सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तसेच, बीडमधील मराठा समाजाचाही धनंजय मुंडेंच्या नावाला विरोध होता. अशा परिस्थितीमध्ये मुंडेंना बीडचे पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अखेर यादी आली अन् त्यातून मुंडेंचे नाव वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धनंजय मुंडेंना फक्त बीडच नाही, तर कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले नाही.

मुख्यमंत्र्यांकडे सर्वात संवेदनशील जिल्हादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथेप्रमाणे राज्यातील सर्वात संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेतले आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तर, पंकजा मुंडे यांना जालन्याच्या पालकमंत्री असतील. याशिवाय, दोन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना जबाबदारी दिली आहे. तर, मुंबई उपनगरची जबाबदारी आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असेल. 

येथे क्लिक करुन पाहा पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडSantosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराडAjit Pawarअजित पवार