शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : तिढा सुटला, फॉर्म्युला ठरला; 'असं' होणार मंत्रिपदांचं वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 06:57 IST

महाविकास आघाडीकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय मंत्रिपदांच्या वाटपाचा तिढादेखील सुटला आहे. शिवसेना नेत्यांच्या शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार आहोत, असे सांगितले. त्यानंतर सर्व सेना नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले, असे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेस नेत्यांनी धरला होता. मात्र, उद्धव यांनी तेव्हा त्यास अद्याप होकार दिला नव्हता. बैठकीनंतर शिवसेना नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली. तिथे सेनेच्या नेत्यांनीही उद्धव यांना आपणच मुख्यमंत्री व्हा, असा जोरदार आग्रह केला. तो उद्धव यांनी मान्य केला, असे खा. राऊत म्हणाले.15-15-12 चा फॉर्म्युलाफॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे पाच वर्षे मुख्यमंत्रीपद तसेच 10 कॅबिनेट व पाच राज्यमंत्रिपदे असतील. राष्ट्रवादीकडे 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदे तर काँग्रेसकडे 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदे असतील. याशिवाय विधानसभाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे यासाठी दिलीप वळसे-पाटील तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. अस्थिर राजकीय वातावरणात विधानसभाध्यक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळेच हे पद आपल्याकडे राखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते अतिशय आग्रही आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस