शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शिवसेना-भाजपामधील तिढा सोडवण्यासाठी संघाचा पुढाकार; पण ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 21:02 IST

आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई: भाजपा आणि शिवसेनेमधील दरी दिवसागणिक रुंदावत आहेत. शिवसेनेनं एनडीएमधून बाहेर पडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन पक्षांमध्ये समेट घडवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबद्दलची माहिती आमदारांच्या बैठकीत दिली. भाजपा आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी संघातील काहींनी प्रयत्न केले. मात्र मी त्यात फारसा रस दाखवला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेनं सर्व आमदारांना मुंबईतील ललित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. या आमदारांची आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आमदारांशी संवाद साधत सरकार आपलंच येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्धव यांनी संघाचाही उल्लेख केला. 'भाजपाशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी संघानं पुढाकार घेत संपर्क साधला. मात्र आता खूप उशीर झाल्याचं मी त्यांना सांगितलं. शरद पवार आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच सरकार येईल असं मी संघाला सांगितलं', असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील आपण भाजपासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नसल्याचं म्हटलं. भाजपासोबत न जाता शिवसेना आणि काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला आहे. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करेल. अजित पवारांचं विधान खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ