Maharashtra government request to stop screening of the film Muhammad The Messenger of God to Central government | महंमद पैगंबरांशी संबंधित चित्रपटाच्या डिजिटल रिलीजवर बंदी घाला; राज्य सरकारचं केंद्राला पत्र

महंमद पैगंबरांशी संबंधित चित्रपटाच्या डिजिटल रिलीजवर बंदी घाला; राज्य सरकारचं केंद्राला पत्र

मुंबई - महंमद द मेसेंजर ऑफ गॉड  या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी सायबर विभागाकडे आलेल्या  तक्रारीच्या पाश्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार चित्रपट प्रसारणावर बंदी घालावी, असे पत्र राज्य सरकाने केंद्र शासनास पाठवले आहे. या चित्रपटामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने राज्य सरकारकडून केंद्राला पत्र पाठवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी दिली आहे.

या चित्रपटाचे प्रसारण २१ जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. परंतु त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत, त्यामुळे त्यावर बंदी घालावी, असे निवेदन रजा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठवले होते. त्यास अनुसरून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाला पत्र पाठवून या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणावर बंदी घालावी तसेच यु ट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्स ऍप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला सदर चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.