शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयासह होणार परिसराचा पुनर्विकास, तत्त्वत: मान्यता; लवकरच प्रस्ताव

By यदू जोशी | Updated: November 30, 2023 06:58 IST

Maharashtra Government: मंत्रालय, विधानभवन, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले यासह संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. लवकरच  यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली जाणार आहे. 

- यदु जोशीमुंबई - मंत्रालय, विधानभवन, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले यासह संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. लवकरच  यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली जाणार आहे. चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनासंदर्भात वास्तुविशारद पी. के. दास यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण केले. त्यावेळी मंत्रालय पुनर्विकासाचीही संकल्पना त्यांनी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती उचलून धरली. मंत्रालयाला २१ जून २०१२ रोजी लागलेल्या आगीनंतरच पुनर्विकास व्हायला हवा होता. सध्याची गरज लक्षात घेता असा पुनर्विकास करणे अत्यंत गरजेचे आहे, असा मंत्रिमंडळाचा सूर होता. 

ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी समितीपुनर्विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. पुढची ५० वर्षे उपयुक्त राहील, अशी इमारत उभारण्यावर भर दिला जाईल. 

एकच भव्यदिव्य इमारत उभारणार?मंत्रालयाची मुख्य इमारत, विस्तारित इमारत, आकाशवाणी आमदार निवास, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले, सचिवालय जिमखाना, शासकीय निवासस्थाने तसेच विधानभवन पाडून एकच भव्य परिसर उभारण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Mantralayaमंत्रालयVidhan Bhavanविधान भवनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार