शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

CoronaVirus News: कोरोना संकटात नोकरीच्या संधी! आरोग्य विभागात १६ हजार पदांसाठी मेगाभरती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 5:04 PM

CoronaVirus News: कोरोना संकटात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण; तिसऱ्या लाटेचाही धोका असल्यानं आरोग्य विभागात मोठी भरती

मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसागणिक आणखी धोकादायक स्वरूप धारण करत आहे. यानंतर पावसाळ्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण १२ हजार पदांचा, तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी २ हजार पदांचा समावेश असेल.येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. यासंदर्भात पुढील निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची आवश्यकता असल्याचं आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं. आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाईल. त्यानंतर तातडीनं परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती टोपेंनी दिली.हायकोर्टाच्या कोरोनाबाधित न्यायमूर्तींना वेळेत उपचार नाहीत; VVIP रुग्णालयातही बेड न मिळाल्यानं मृत्यू

कोणत्या वर्गासाठी किती जागांची भरती केली जाईल, याचीदेखील माहिती राजेश टोपे यांनी दिली. क आणि ड वर्गातील १२ हजार जागा, ब वर्गातील डॉक्टर-मेडिकल ऑफिसर्सच्या २ हजार जागा आणि २ हजार स्पेशालिस्ट यांच्या जागा भरण्याचा निर्णय आपण घेत आहोत. त्याची शासन स्तरावरील कारवाई आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर क आणि ड वर्गासाठी एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून ब वर्गाच्या मुलाखती घेतल्या जातील. तर अ वर्गासाठीचे सिलेक्शन एमपीएससीकडे पाठवले जातील”, असं टोपेंनी सांगितलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या