शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'तो' फोन आला अन् सुप्रिया सुळे विधान भवनातून धावत निघाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 11:14 IST

सुप्रिया सुळे अचानक विधान भवन परिसरातून निघाल्यानं चर्चांना उधाण

मुंबई: नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागतासाठी विधान भवन परिसरात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अचानक तिथून बाहेर पडल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपासून सुप्रिया सुळे विधिमंडळात उपस्थित होत्या. त्यांनी अजित पवार, रोहित पवार, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, प्रणिती शिंदेंचं विधान भवनात स्वागत केलं. मात्र अचानक त्यांना फोन आला आणि त्या तिथून धावत धावत बाहेर पडल्या. त्यामुळे सुप्रिया सुळेंना नेमका कोणाचा फोन आला, याची चर्चा विधान भवन परिसरात सुरू झाली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपाचं सरकार कोसळलं. त्यामुळे महाविकासआघाडीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आज सकाळी विधान भवन परिसरात सुप्रिया सुळे नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागताला उपस्थित होत्या. अजित पवार विधान भवनात दाखल होताच सुप्रिया यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादीतून बंडखोरी करत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी काल सिल्व्हर ओकवरुन जाऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळीही तिथे सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरे, रोहित पवार या तरुण आमदारांचं विधान भवन परिसरात उत्साहात स्वागत केलं. यानंतर तटकरे कुटुंब विधान भवनात दाखल झालं. तटकरे कुटुंबासोबत फोटो सेशन करताना सुप्रिया सुळेंना एक फोन आला आणि त्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दूर सारत तिथून निघाल्या. सुप्रिया सुळे अतिशय घाईघाईंनं आणि धावत पळत विधान भवन परिसरातून निघाल्यानं त्यांना नेमका कोणाचा फोन आला, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार