शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शिंदे सरकारच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला, या तारखेला होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:55 IST

Maharashtra Government: ३० जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या शपथविधीनंतर पंधरवडा उलटत आला तरी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली असून, येत्या १९ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

मुंबई - जून महिन्यात घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले होते. तर एकनाथ शिंदेभाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले होते. मात्र ३० जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या शपथविधीनंतर पंधरवडा उलटत आला तरी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली असून, येत्या १९ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड केलेल्या आमदांरांच्या गटातील ज्येष्ठ नेते आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार अशी विचारणा आमदार संजय शिरसाट यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, उद्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मुंबईत येत आहेत. त्यांच्यासोबत बैठक होणार आहे. १५ तारखेला आमची एक बैठक आहे. १६ आणि १७ तारखेलाही काही कार्यक्रम आहे. तर १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहेत. त्यामुळे १९ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याशिवाय हे सरकार चालू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या सरकारमध्ये ४२ च्या आसपास मंत्री राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपाचे २५ ते २७ आणि शिंदे गटाचे १५ ते १७ मंत्री असू शकतात. मात्र या सरकारची वाटचाल ही कोर्टात सुरू असलेल्या विविध याचिकांवर होणाऱ्या सुनावणीवरही या सरकारचं भवितव्य अवलंबून असेल. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार