शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: 'त्या' बेपत्ता आमदाराचा व्हिडीओ आला; पण भूमिकेमुळे गोंधळ आणखी वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 13:31 IST

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या व्हिडीओनं संभ्रम वाढला

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असून राजकीय घडामोडी अतिशय वेगानं सुरू आहेत. महाविकासआघाडीच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 13 आमदार होते. त्यापैकी बहुतांश आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. कालपासून बेपत्ता झालेले राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केलेल्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला आहे. शहापूरचे आमदार दौलत दरोडांनी थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. 'मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, मी अतिशय सुरक्षित आहे. घड्याळ या निशाणीवर निवडून आल्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्न येत नाही. मी माननीय अजितदादा आणि माननीय शरद पवारसाहेब जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला मी बांधील आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माझी विनंती आहे,' असं दरोडा यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. अजित पवार आणि शरद पवार जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला मी बांधील असल्याचं दौलत दरोडा यांनी जाहीर केलं आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे संभ्रम आणखी वाढला आहे. अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याची भूमिका घेत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांवर कठोर शब्दांत टीका करत राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे दरोडांची भूमिका पेचात टाकणारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार