शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: समन्वयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:18 IST

तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे शिवसेनेशी रविवारपासून चर्चेला प्रारंभ करणार

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्रात बिगरभाजप सरकार स्थापण्याच्या दृष्टीने किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसने आपापल्या प्रत्येकी पाच अशा दहा नेत्यांची एक समन्वय समिती नेमली आहे. त्याचप्रमाणे, तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे शिवसेनेशी रविवारपासून चर्चेला प्रारंभ करतील.राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी असली, तरी आमचे स्वतंत्र जाहीरनामे होते. त्यामुळे आधी आम्ही आमचा किमान समान कार्यक्रम तयार करू. त्यानंतर, शिवसेनेशी चर्चा करून तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविणार आहोत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे व अन्य एक नेता तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे व अन्य एक जण यांचा या दोन पक्षांच्या समन्वय समितीत समावेश असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा किमान समान कार्यक्रम येत्या तीन दिवसांत तयार करण्याचे व त्यांतर शिवसेनेशी तीन पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाविषयी बोलणी करण्याचे सोनिया गांधी व शरद पवार यांच्या बैठकीत ठरविण्यात आले. या घडामोडींमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला अयोध्या दौरा रद्द केला आहे. तिथून ते दिल्लीला जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार होते. तोही बेत आता रद्द झाला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस