शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

सरकारला घेरण्यासाठी भाजपाची रणनीती; माजी शिवसेना नेत्याला विधानपरिषदेत आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 10:17 IST

दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेनेला अडचणीचे आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न

मुंबई: राज्यात स्थापन झालेल्या सरकारला घेरण्यासाठी भाजपानं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत शिवसेनेवर काल पहिला बाण सोडला. देवेंद्र फडणवीसभाजपाचे विधिमंडळातील गटनेते असल्यानं त्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा असेल. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेसमोर मोठं आव्हान असेल. यासोबतच विधानपरिषदेतही शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याची तयारी भाजपानं सुरू केली आहे.शिवसेनेवर कायम तोंडसुख घेणारे आणि ठाकरे कुटुंबावर नेहमी तुटून पडणारे नारायण राणे यांना विधानपरिषदेत आणण्याच्या दृष्टीनं भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिल्लीतील भाजपा नेत्यांशी संपर्कदेखील साधण्यात आला आहे. कधीकाळी कडवे शिवसैनिक राहिलेले नारायण राणे आता ठाकरे कुटुंबाचे कडवे टीकाकार मानले जातात. भाजपाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त टीका राणे कुटुंबाकडून ठाकरेंवर केली जाते. त्यामुळेच त्यांना विधानपरिषदेत आणून शिवसेनेसमोर अडचणी निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे कणकवलीतून विजयी झाल्यानं ते विधानसभेत दिसतील. त्यामुळे शिवसेनेला अंगावर घेताना फडणवीस यांना नितेश राणेंची साथ मिळेल. मात्र विधानपरिषदेत भाजपाकडे मोठा चेहरा नाही. त्यामुळेच नारायण राणेंना विधानपरिषदेत आणण्यासाठी भाजपानं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या राणे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते विधानपरिषदेत आल्यास दोन्ही सभागृहांमध्ये सरकारची आणि विशेषत: शिवसेनेची कोंडी करता येऊ शकते, असं भाजपामधील नेत्यांना वाटतं. राणे विधानपरिषदेत आल्यास वारंवार ठाकरे विरुद्ध राणे संघर्ष पाहायला मिळू शकतो.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस