शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 19:41 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप करत शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. यावर शहा यांनी टीका केली आहे.

नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटी लागू झालेली आहे. शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागली असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. शिवसेना राष्ट्रवादीलाही सत्ता स्थापन करता न आल्याने मध्यावधी निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. यावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप करत शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. यावर शहा यांनी टीका केली आहे. शिवसेनेला तीन दिवस हवे होते, आता तर पाच दिवस झाले आहेत. तरीही त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. राज्यपालांनी अजून सहा महिने दिले असल्याचा टोला शहा यांनी लगावला. तसेच भाजपा मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याच्या वृत्तावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईत आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. या बैठकीत संघटनात्मक कार्यप्रणालीवर चर्चा करण्यात येणार आहे. गरज पडली तर मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. 

मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असे आपल्याला वाटत नाही आणि तसा विचारही मी करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल राष्ट्रपती राजवटीचे सहा महिने पूर्ण झाल्यास कायदेशीर सल्ला घेतील. त्यानंतर त्यांचा निर्णय घेतील. तोपर्यंत कोणत्याही पक्षाने बहुमत दाखविल्यास त्यांचे सरकार स्थापन करू शकतात, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याचबरोबर राष्ट्रपती राजवट लागू केल्यावरून होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. 

राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याचा तोटा भाजपालाच जास्त झाला आहे. विरोधकांचे यात नुकसान काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच जर राष्ट्रपती राजवट लागू केली नसती तर आमच्यावर सरकार सुरूच ठेवल्याचा आरोप झाला असता, असेही त्यांनी म्हटले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार