शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: आरेमधल्या झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 18:17 IST

आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे.

मुंबईः गेल्या महिन्याभरापासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. ठाकरे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. ठाकरे विश्वासदर्शक ठराव मांडत असताना भाजपानं सभात्याग केला आहे. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. परंतु युवा सेना प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाच्या गोंधळावर काहीही बोलण्याचं टाळलं.एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं त्यांना भाजपानं घातलेल्या गोंधळासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, आता लक्ष महाराष्ट्राच्या विकासावर आहे, आता कामं सुरू झालेली आहेत, इतर गोष्टींवर मला बोलायचं नाही. तसेच आता मुख्यमंत्री सांगतील आणि कॅबिनेट ठरवत जाईल, असं सूचक विधानही आदित्य ठाकरेंनी केलं आहे. ज्यांनी झाडांची कत्तल केली, त्यांच्यासंदर्भात एक एक पाऊल सावकाश उचलू. कामं आता सुरू झालेली आहेत, मुंबईसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, असंही त्यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाची स्तुती केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी काल आरे कारशेडला स्थगिती दिली असली तरी मेट्रोचं काम सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मागील राज्य सरकारच्या कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. दिलेला शब्द पाळणं हे आमचं तत्त्व असल्याचं म्हणत आरे कारशेडला स्थगिती दिली होती. मेट्रो कारशेडच्या संपूर्ण कामाचा आढावा घेतल्यानंतरच पुढे काय करायचं हे ठरवलं जाईल. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर टीका केलेली होती.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAarey Coloneyआरे