शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : धोकेबाजांना जागा दाखवूच - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 02:18 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी शब्दच दिला नव्हता, असे सांगून मला खोटे ठरविणाऱ्या धोकेबाजांना धडा शिकवायचाच असून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे अटळ आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.शिवसेना आमदारांची मातोश्रीवर शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत बोलताना उद्धव म्हणाले, ‘हे आपल्याला सोडून जातील कुठे,यांना आपल्याशिवाय पर्याय नाही’ असे वाटणाºया भाजपने आम्हाला अनेक वर्षे गृहित धरले. शिवसेनेची त्यांच्यासोबत फरपट झाली. नितीशकुमार यांच्याबरोबर भाजप सोईनुसार युती तोडते आणि नंतर करते, त्यांना मेहबुबा मुफ्तीही सत्तेसाठी चालतात मग आमचे वावडे कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.फडणवीसांनी मला खोटे ठरविले‘तुम्ही मला इतकी वर्षे पाहत आहात, मी कधीच खोटे बोललेलो नाही, तो माझा संस्कार नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी मलाच खोटे ठरविले. आता त्यांना धोकेबाजांना जागा दाखविण्याची वेळआली आहे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याइतपत आमच्याकडे संख्याबळ नाही. अशावेळी कोणाची ना कोणाची मदत घेणे आवश्यक होते. आम्हाला गृहित धरणाऱ्यांच्या मागे जाण्यापेक्षा आम्ही नवीन मित्र शोधले, असे उद्धव म्हणाले.गेली तीस वर्षे भाजपचे आम्ही मित्र होतो पण इतक्या जुन्या मित्राची त्यांनी किंमत ठेवली नाही. विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेबाबत विश्वासात घेण्याची गरजही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना वाटली नाही, अशी टीका उद्धव यांनी बैठकीत केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा