शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र गारठला; मुंंबई@११.४ तर महाबळेश्वरात हिमकणांची चादर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 6:56 AM

निफाड २.४ अंश सेल्सिअस

मुंबई/नाशिक/सातारा : उत्तरेकडील शीतलहरी आणि राज्यातील कोरड्या हवामानामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असून मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली आहे. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात २.४ अंश सेल्सिअस तापमान होते. गोदाकाठावरील गावांमध्ये तर दवबिंदू गोठले होते.

जिथे नेहमी घामाच्या धारा वाहतात, त्या मुंबईचे किमान तापमान आज ११.४ अंश नोंदविण्यात आले. सन २०१३ नंतर नोंदविण्यात आलेले हे सर्वात कमी किमान तापमान आहे. नववर्षाच्या प्रारंभापासूनच नाशिककर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. गुरुवारपासूनच वाढत्या थंडीबरोबर गार वारेदेखील वाहू लागल्याने बोचरी थंडी जाणवू लागली आहे. प्रचंड थंडीचा द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

महाबळेश्वरमध्ये शुक्रवारी सकाळी वेण्णा जलाशय परिसरात हिमकणांचे दर्शन झाले. दवबिंदू गोठल्याने सर्वत्र पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली होती. यंदाच्या हंगामात प्रथमच हिमकण पाहावयास मिळाले. लिंगमाळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या पानांवर तसेच गवतावर हिमकणांचा गालिचा पाहावयास मिळाला.गारठलेली शहरे(किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये)निफाड (नाशिक) : २.४जळगाव ७ । औरंगाबाद ८.१पुणे ८.२ । अहमदनगर ९.२महाबळेश्वर १० । सातारा १०.२बुलडाणा ११.४ । मुंबई ११.४नांदेड ११.५ । परभणी १२.७

टॅग्स :weatherहवामानMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान