शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 06:49 IST

 शेतीसाठी मातीवर रॉयल्टीची आकारणी नाही, ओल्या दुष्काळाचे सर्व निकष लागू करणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अतिवृष्टी झाली हे निश्चित करण्यासाठीचे जे निकष आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांमध्ये पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. यासह मदतीचे विविध निकष बदलण्याबाबतचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने तयार केले असून राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्याबाबत काय निर्णय होणार याविषयी उत्सुकता आहे.

 एखाद्या गाव परिसरात अतिवृष्टी झाली का हे ठरवण्यासाठी सरकारचे काही निकष आहेत. त्यात प्रामुख्याने एकूण किमान ६५ मिलिमीटर किंवा पाच दिवसांपर्यंत दररोज किमान १० मिलिमीटर पाऊस पडलेला असावा हा महत्त्वाचा निकष आहे. मात्र  एवढा पाऊस पडलेला नसतानाही अनेक गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. कारण अन्य ठिकाणच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी त्या गावांमध्ये शिरले आणि अतोनात नुकसान झाले. त्यामुळे प्रत्यक्ष त्या गावात किती पाऊस झाला हा निकष बाजूला ठेवावा असे मदत व पुनर्वसन विभागाने प्रस्तावित केले आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत झाला तर अनेकांना दिलासा मिळणार आहे.

११ हजार विहिरी बुजून गेल्या ओल्या किंवा कोरड्या दुष्काळात राज्य सरकार केंद्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) तरतुदीनुसार मदत देत असते. अलीकडच्या अतिवृष्टीमध्ये ११ हजार विहिरी या पूर्णपणेबुजून गेल्या.आता सध्याच्या निकषांनुसार चालायचे तर या विहिरींच्या नुकसानीसाठी मदत देता येणार नाही. पण तीद्यावी असा आग्रहदेखील मदत पुनर्वसन विभागाने धरला आहे.

विविध निर्णयांची शक्यता ओला दुष्काळ असताना ज्या पद्धतीने मदत केली जाते ती सर्व मदत देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन, विद्यार्थ्यांना शुल्कमाफी आदी निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनानुसार विविध कंपन्यांनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात वस्तू स्वरूपात मदत दिली आहे. त्यात आरोग्य किट आणि शालेय बॅग, कंपास आदींचा समावेश आहे. त्याचे वितरण दोन-तीन दिवसात सुरू होईल. 

जमिनीचा मोबदला वाढणार दुरुस्त न होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार तर खरवडून निघालेल्या जमिनीसाठी  हेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा नियम आहे. मात्र तो बदलावा आणि दोन्हींसाठी एकाच स्वरूपाची मदत द्यावी आणि मदतीतदेखील वाढ करावी असेही प्रस्तावित असल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Revise Rainfall Criteria, Aid Farmers, Wells' Relief Proposed.

Web Summary : Maharashtra likely to ease rainfall criteria for flood relief in Marathwada. Buried wells may get aid. Compensation for land damage is also expected to increase.
टॅग्स :Farmerशेतकरीfloodपूर