शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Maharashtra Government: राज्यपालांच्या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 07:11 IST

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्यरात्रीनंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केली आणि ती उठताच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सकाळी ७.४५ वाजता मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आकस्मिकपणे घडलेल्या या घडामोडीवर  शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी लागला, त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासंदर्भात समर्थता दर्शविण्यासाठी मुदत दिली. भाजपने असमर्थता व्यक्त करताच, शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. शिवाय शिवसेनेला पाठिंब्यासंदर्भात आमदारांच्या सह्यांचे स्वतंत्र पत्रे सादर करण्यास सांगितले होते. हा नियम फडणवीस व अजित पवार यांना का लावण्यात आला नाही, असा सवाल शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजच्या घडामोडींनंतर उपस्थित केला आहे.शहानिशा केली का-नवाब मलिकअजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून आमदारांचे जे पत्र सादर केले, त्यातील नावांची वा खरोखर त्या आमदारांचा पाठिंबा आहे का, याची शहानिशा केली का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला.फडणवीस व अजित पवार यांनी राज्यपालांना किती आमदारांच्या आणि किती वाजता पाठिंब्याचे पत्र दिले?याचे उत्तर राज्यपालांनी द्यायला हवे, अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस