शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चाललेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष - आशीष शेलार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 09:03 IST

मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर भाजपापासून दुरावलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसशी जवळीक साधत सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

मुंबई -  मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर भाजपापासून दुरावलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसशी जवळीक साधत सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या तिन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापनेबाबत बऱ्यापैकी एकमत झाले आहे. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष आहे, असे आशीष शेलार यांनी सांगितले. भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेलार म्हणाले की, ''राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजपाचे आमदार पाहणी दौरा करणार आहेत. तसेच राज्यात 90 हजार बुथांवर होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. त्याबरोबरच राज्यात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या तीन अंकी नाटकाकडेही आमचे लक्ष आहे.''  दरम्यान, चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला होता. तुम्ही मुंबईला आता यायचं नाही. इथून निघून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा अन् त्यांचं दु:ख हे आपलं दु:ख असल्याचं मानून कामाला लागा, असे ते म्हणाले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सर्व माजी मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत फडणवीस म्हणाले, सत्तास्थापनेबाबत येत असलेल्या कोणत्याही बातम्यांनी तुम्ही विचलित होऊ नका. योग्यवेळी योग्य निर्णय होईल. सरकार आपलेच येणार आहे. भाजप वगळता कोणतेही सरकार होऊ शकत नाही. तुम्ही मुंबईत थांबू नका, पुढचे दोनतीन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावरच तुम्ही दिसले पाहिजे. शेतकºयांना भक्कम मदत मिळेल यावर जातीने लक्ष द्या.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019