शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 05:16 IST

भाजपने सत्तेचा आणि पैशांचा वापर केला आणि एका रात्रीत चित्र पालटले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

मुंबई : भाजपने सत्तेचा आणि पैशांचा वापर केला आणि एका रात्रीत चित्र पालटले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या घडामोडींमागे केवळ अजित पवारच आहे. शरद पवार यांचा यात कोणताही हात नाही, या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी घडलेल्या घडामोडींवर प्रतिक्रीया व्यक्त केली.राऊत म्हणाले की, शुक्रवारी रात्री ९ पर्यंत अजित पवार आमच्यासोबत चर्चा करत होते. मात्र, ते नजरेला नजर भीडवून बोलत नव्हते. जो व्यक्ती पाप करणार असतो, तोच नजरेला नजर भीडवू शकत नाही. त्यानंतर ते अचानक गायब झाले. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.रात्रीच्या अंधारात राष्ट्रपती भवन खोलून त्यांनी राष्ट्रपती राजवट हटविली. मोदींच्या राजवटीत हे सारे होत असल्याचे आश्चर्य वाटते. कितीही चोरी लबाडी करा पण हिंमत असेल तर ३० नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करून दाखवा. आज सकाळी अजित पवारांसोबत गेलेल्या आठ आमदारांपैकी पाच परत आले आहेत. त्या आमदारांचे अपहरण झाले होते असेच म्हणावे लागेल.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ते परत आले. कदाचित अजित पवारांना ब्लॅकमेल केले गेल्याने त्यांनी असा निर्नय घेतला असावा. पण, तुम्ही किती लोकांना ब्लॅकमेल करणार, किती लोकांच्या कानपट्टीला बंदूक लावणार असा सवाल राऊत यांनी भाजपला केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019