शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Maharashtra Government: अजित पवारांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 17:32 IST

राज्यामध्ये शनिवारी झालेल्या राजकीय उलथापालथींनंतर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधून काही तांत्रिक मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केला.

राज्यामध्ये शनिवारी झालेल्या राजकीय उलथापालथींनंतर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधून काही तांत्रिक मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. विशेषत: अजित पवार त्यांना समर्थन करणाऱ्या आमदारांचा गट घेऊन बाहेर पडले तर काय स्थिती उद्भवेल, सरकार आपले बहुमत सिद्ध करू शकेल का आणि मुख्य म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा या संदर्भात काय सांगतो या सगळ्या प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी नेहा सराफ यांनी केलेली बातचित.सध्या महाराष्ट्रात जी राजकीय स्थिती उद्भवली आहे, ती बघता पक्षांतरबंदी कायदा काय सांगतो?१९८५ मध्ये ५२ वी घटनादुरुस्ती करून राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आणला आणि भारतीय लोकशाहीवर ख-या अर्थाने उपकार केले. मूळ कायद्यात एक तृतीयांश आमदार जरी पक्षातून बाहेर पडले तरी त्याला विभाजन समजून ते अपात्र ठरत नव्हते. मात्र ९१ व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदीनुसार दोन तृतीयांश आमदार बाहेर पडले किंवा त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला तर मात्र ते अपात्र होत नाहीत.संबंधित सदस्य अपात्र होण्यासाठी नेमका काय नियम आहे ?ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात तो पक्ष सोडलात किंवा संबंधित पक्षाचा व्हीप मोडला किंवा मतदान करण्याचे टाळले तर अपात्र होऊ शकतो. मात्र अपात्र झाल्यावर ते निवडणूक लढवू शकतात. तसा निर्णय कर्नाटकच्या उदाहरणात न्यायालयाने दिला आहे.अजित पवार यांना अपात्र न होण्यासाठी किती आमदारांचे समर्थन लागेल आणि तसे झाले नाही तर काय परिस्थिती ओढावेल ?राष्ट्रवादीकडे ५४ आमदार संख्या आहे. त्यामुळे अजित पवार यांना कमीतकमी ३६ आमदारांचे समर्थन लागेल. तसे झाले नाही तर त्यांच्या बाजूने मतदान करणारा संपूर्ण गट अपात्र होईल. मात्र त्यातही १५ दिवसांच्या आत पक्षाने सांगितले की आम्ही आमदारांना माफ केले तर हे अपात्र होणे टळू शकते. मात्र तसे झाले नाही तर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो.आता शपथविधी झाल्यावर बहुमत सिद्ध करता आले नाही तर पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का ?अर्थात हो. राष्ट्रपती राजवट लागू शकते आणि सहा महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतील. अक्षरश: महाराष्ट्राच्या जनतेवर निवडणुका लादल्या जातील. कोणी सत्तेत बसायचं आणि कोणी विरोधात बसायचं हे जनतेने स्वच्छपणे सांगितलेले असतानाही परंतु राजकीय पक्षांनी एका अर्थाने जनतेचा विश्वासघात केला आहे, असे म्हणावे लागेल.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019