शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला हवेत ६० हजार कोटी; घोषणेची प्रतीक्षा

By यदू जोशी | Updated: November 28, 2019 05:32 IST

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायची तर शासनाच्या तिजोरीवर ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे.

 - यदु जोशीमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायची तर शासनाच्या तिजोरीवर ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची आग्रही भूमिका सातत्याने घेतली आहे. आता मुख्यमंत्री म्हणून ही कर्जमाफी ते कधी जाहीर करतात या बाबत उत्सुकता आहे.देवेंद्र फडणवीस सरकारने ४४ लाख ५० हजार शेतकºयांना १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दिली होती. मात्र, ती सरसकट दिलेली नव्हती. १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले होते आणि त्यावरील रकमेचे कर्ज असल्यास दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाने भरली आणि उर्वरित रक्कम ही शेतकºयांना भरावी लागली होती. या शिवाय सावकारांकडील शेतकºयांचे कर्ज शासनाने स्वत:च्या तिजोरीतून भरत दिलासा दिला होता. ७१ लाख शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. केवळ शेतीवर अवलंबून नसलेल्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नव्हती.सहकार विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, फडणवीस सरकारने जून २०१६ पर्यंत थकित असलेले कर्ज माफ करण्याचा निकष लावला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. आता सातबाराच कोरा करायचा असेल तर त्यानंतर असलेली कर्जाची थकबाकीदेखील माफ करावी लागेल. ही रक्कम ६० हजार कोटींच्या घरात असेल.आधीच्या सरकारने दीड लाखांपर्यंतचेच कर्ज माफ केले होते आता नव्या सरकारने त्याहून अधिक रकमेची कर्जेही सरसकट माफ केली तर त्याचा दहाएक हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा शासनाच्या तिजोरीवर पडेल. जून २०१६ मध्ये घेतलेल्या आणि परतफेड न केलेल्या थकबाकीची रक्कम ४० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.राज्य शासन जून २०१६ नंतरचेही कर्ज कधी ना कधी कर्ज माफ करेल असे मानून असंख्य शेतकºयांचा कल हा परतफेड न करण्यामागे आहे. त्यातच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शेतकºयांना मोठी कर्जमाफी देणार अशा बातम्या अलिकडे येत असताना परतफेडीबाबतची अनुत्सुकता वाढली आहे.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रम ठरविताना सरसकट कर्जमाफीचा विषय अजेंड्यावर घेतलेला आहे की नाही या बाबत अद्याप स्पष्टता नाही.विशेषत: शिवसेना त्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही राहिली आहे आणि भाजपबरोबर सत्तेत असतानाही त्यांनी ही मागणी लावून धरली होती. माहिती अशी आहे की किमान समान कार्यक्रम निश्चित करताना महाराष्ट्र विकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांनी या संदर्भात वित्त विभागाच्या काही अधिकाºयांना अलिकडे बोलावून घेत चर्चा केली होती, तेव्हा तिजोरीची अवस्था त्यांनी सांगितली होती.राज्यावर४.७१ लाख कोटी रुपयांचे कर्जराज्य शासनावर ४ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ साधताना सरकारला नेहमीच कसरत करावी लागते. वेतन, निवृत्तीवेतन आणि व्याज यावरील खर्च १ लाख ८६ हजार ८०० कोटी रुपये असतो.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019