शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 19:51 IST

Manoj Jarange patil Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून उमेदवार भेटी घेताना दिसत आहे. 

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ४६ जागांचा निकाल काय लागेल, याबद्दल सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर खूप निर्णायक ठरला होता. छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता इतर ७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून मनोज जरांगेंच्या भेटी वाढल्या आहेत. 

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने संजय शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात मराठा फॅक्टर महत्त्वाचा आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांनी आज मनोज जरांगेंची भेट घेतली. 

संदीप क्षीरसागर मनोज जरांगे भेट

बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी रविवारी (२७ ऑक्टोबर) मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. 

महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भेटी

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मनोज जरांगे यांच्या भेटी घेत आहेत. मनोज जरांगे यांनी काही मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी उमेदवार दिला जाणार नाही, तिथे कोणत्या उमेदवाराला पाडायचं हे ठरवून अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे.  मनोज जरांगे यांचा मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीत प्रभाव दिसेल, असे राजकीय नेते, राजकीय विश्लेषक सांगत आहेत. मराठवाड्यात विधानसभेच्या ४६ जागा आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी मराठा उमेदवार, ओबीसी आणि इतर समुदायातील उमेदवार देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. 

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. विशेषतः भाजपचं जास्त नुकसान झालं होतं. भाजपने जालना, बीड, नांदेड, लातूर हे मतदारसंघ गमावले. तर शिंदेंच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती. 

परभणीची जागा महायुतीने रासपचे महादेव जानकर यांना दिली होती. पण, त्यांचा पराभव झाला. धाराशिवची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गमवावी लागली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathaमराठाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी