शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 06:43 IST

राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत आतापर्यंत ६६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत ही जप्ती करण्यात आली आहे.  २०१९ मध्ये पूर्ण निवडणूक काळात १२२ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

दरम्यान, राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.

नेमके काय केले जप्त?

- १५३ कोटी रुपयांची रोख रक्कम

- ६८ कोटी ६३ लाख रुपये किमतीची ६८ लाख ५१ हजार ३६४ लिटर दारू

- ७२ कोटी रुपयांचे १ कोटी १ लाख ४२ हजार ४५२ ग्रॅम अमली पदार्थ

- २८२ कोटी ४९ लाख किमतीचे १ कोटी ६४ लाख ७२ हजार ५९६ ग्रॅम मौल्यवान धातू

- ३ कोटी ७८ लाख रुपयांच्या मोफत वाटपासाठी आणलेल्या ५७ हजार ९४९ वस्तू 

- इतर साहित्यामध्ये १३ लाख ७३ हजार ७७५ इतक्या ७५ कोटी ६० लाखांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या.

आणखी कुठे कारवाई?

अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे कार्यान्वित स्थिर सर्वेक्षण पथकाने सोमवारी कारमधून एक लाख रुपयांची रोकड जप्त केली.

सोलापूर येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल, ८० हजारांची रोख रक्कम जप्त.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक 2024