शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:46 IST

इतर पक्षातून नेत्यांना आयात करून पक्षात तिकीट देत असल्याने शरद पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. 

भंडारा -  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. मात्र या पक्षप्रवेशामुळे पक्षातील निष्ठावंत नाराज झाल्याचे चित्र दिसून येते. इंदापूरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर तिथल्या स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध केला. आता इंदापूरसारखीच स्थिती भंडारा जिल्ह्यात निर्माण झाली आहे. याठिकाणी शरद पवार गटात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी आमदार चरण वाघमारे यानी २ दिवसांपूर्वी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला, तेव्हापासून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे. हे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याची तयारीही करत आहेत. 

वर्षभरापूर्वी बीआरएसमध्ये गेलेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला जिल्ह्यातील नेते आधीपासून विरोध करत होते. या नेत्यांचे मत विचारात न घेता वाघमारे यांना पक्षप्रवेश दिल्याने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या घटनेनंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मुंबईत आले. या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. चरण वाघमारेंना पक्षप्रवेश आणि उमेदवारी देणार असाल तर आम्हा निष्ठावंतांचा पक्षात काय उपयोग असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

"निष्ठावंतांची वज्रमूठ तयार करा" 

निष्ठावंतांना डावलून सत्तापिपासू लोकांना पक्षात स्थान मिळत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी केला. शिर्डीच्या सभेत पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना निष्ठा जपण्याचा संदेश दिला मात्र अनेक पक्ष फिरून आलेल्या चरण वाघमारे यांना प्रवेश देऊन तिकीट निश्चित करताना निष्ठा कुठे गेली हा प्रश्न जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी उपस्थित केला. चरण वाघमारे यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत फेरविचार केला नाही तर सामूहिक राजीनामे देण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेत याबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

चरण वाघमारेंचं सातव्यांदा पक्षांतर

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पक्ष प्रवासावरून राजकीय विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आजवरच्या त्यांच्या राजकीय वाटचालीत सुरुवातीला ते शिवसेनेत होते, त्यानंतर मनसेत गेले. पुढे विदर्भ विकास परिषदेतही त्यांनी काम केले. त्यानंतरच्या काळात ते काँग्रेसमध्ये गेले. तिथेही फार काळ न रमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तिथूनही बाहेर पडून अपक्ष राहून निवडणूक लढवली. त्यानंतर ते भाजपात गेले. तिथे पक्षातील स्थानिक नेत्यांशी बिनसल्याने ते विकास फाऊंडेशन या गटाची स्थापना केली. अलीकडेच वर्षभरापूर्वी चरण वाघमारेंनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. 

टॅग्स :tumsar-acतुमसरbhandara-acभंडाराmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४