शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने उतरविली नेत्यांची फौज; व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 07:05 IST

दानवे यांनी नावे जाहीर केल्याच्या काही तासांतच सोमय्या  यांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले

मुंबई - माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे प्रदेश भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील. या निवडणुकीसाठी विविध समित्या पक्षाने स्थापन केल्या असून त्यांचे अध्यक्षपद ज्येष्ठ नेत्यांना देण्यात आले आहे. 

दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बूथपर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुकास्तरावर अधिवेशने झाली. 

विविध समित्यांचे प्रमुख असे - जाहीरनामा समिती -  सुधीर मुनगंटीवार, विशेष संपर्क – चंद्रकांत पाटील, सामाजिक संपर्क -  पंकजा मुंडे, महिला संपर्क -  विजया रहाटकर, कृषिक्षेत्र संपर्क - खा. अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क - राधाकृष्ण विखे-पाटील, युवा संपर्क -  रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा – रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क - प्रवीण दरेकर, माध्यमे - आ. अतुल भातखळकर, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क -मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क -  भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क - डॉ. विजयकुमार गावित, समाजमाध्यम- आ. निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क-  किरीट सोमय्या. महायुती निवडणूक अभियान समन्वयक - गिरीश महाजन.

विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,  मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर हे पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.

अपमानास्पद वागणूक, किरीट सोमय्या संतापले

माजी खासदार किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून रावसाहेब दानवे यांनी नियुक्ती जाहीर केली पण काही तासातच सोमय्या यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला.  दानवे यांनी नावे जाहीर केल्याच्या काही तासांतच सोमय्या  यांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशी अपमानास्पद वागणूक मला देऊ नये, असे त्यांनी सुनावले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४