शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 12:20 IST

निकालानंतरच्या दोन आठवड्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम

मुंबई: येणाऱ्या काही दिवसात योग्य निर्णय घेऊन भाजपा राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास भाजपाचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही पावलं उचलू. कोअर कमिटीत त्यावर विस्तृत चर्चा झाली आहे. या संदर्भातल्या घटनात्मक तरतुदींशी चर्चा करण्यासाठी आज राज्यपालांची भेट घेणार आहोत. सत्तास्थापनेचा दावा करायचा की करायचा नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या निर्णयानंतर घेऊ, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे. पण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर वाटतं चर्चा बंद आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन व्हावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार कदापि बसवणार नाही. दिल्लीहून तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनंच भाजपानं आत्तापर्यंत वाट पाहिली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. सुधीर मुनगंटीवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील थोड्याच वेळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. या भेटीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याला मुदतवाढ देण्याची विनंती केली जाणार का, असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. त्यावर तो अधिकार राज्यपाल महोदयांचा आहे. आम्ही त्यांच्याशी सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. सर्वात मोठ्या पक्षाकडून यंत्रणेच्या माध्यमातून आमदारांची फोडाफोड करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर भाष्य करताना कुणीही अशा पद्धतीनं आमदारांचा अवमान करू नये असं मुनगंटीवार म्हणाले. लाखो मतदारांच्या आशीर्वादानं जो निवडून येतो, त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्द काढणं योग्य नाही, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. मुख्यमंत्रिपदावर ठाम असलेल्या शिवसेनेनं त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं समजावं, असं म्हणत मुनगंटीवार यांनी मित्रपक्षाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे देवेंद्रजींना शिवसैनिकच समजतात. देवेंद्रजी शिवसैनिक आहेत, हे उद्धव ठाकरेच म्हणालेत. त्यामुळे देवेंद्रजींच्या रूपानं शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल, हेच आम्ही सांगतोय. मग अडचण कुठे आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस