शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

Maharashtra Election 2019: टोलमुक्त महाराष्ट्राच्या आश्वासनाचं काय झालं? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 20:23 IST

Maharashtra Election 2019 विविध मुद्द्यांवरुन राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर तोफ

भिवंडी: भाजपानं गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. लोकांना राग येत नाही. त्यांच्या मनात चीड निर्माण होत नाही. त्यामुळेच सत्ताधारी तुम्हाला गृहित धरतात. त्यामुळे तुमचा संताप मतपेटीतून व्यक्त करा, असं आवाहन राज यांनी केलं. याशिवाय मनसे प्रमुखांनी त्यांच्या भाषणातून आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन सरकारवर तोफ डागली.राज्यातील जनतेला कशाचंच काही वाटत नाही. त्यामुळेच सत्ताधारी बेलगाम झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याला सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. येत्या काळात जबाबदार विरोधी पक्षाची जबाबदारी मनसे समर्थपणे पाडेल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भिवंडी शहरातील प्रमुख समस्यांवर भाष्य केलं. भिवंडीतल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही या भागात राहतातच कसे? तुम्हाला या परिस्थितीचा राग येत नाही का?, असे प्रश्न राज यांनी उपस्थितांना विचारले.नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना रस्ते खड्डेमुक्त होते. उत्तम काम करायचं ठरवल्यास ते होऊ शकतं. पण रस्त्यांच्या कंत्राटांमधून टक्के हवे असतील, तर मग रस्त्यांची कामं व्यवस्थित कशी काय होणार, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गुजरातमधली टोरंट कंपनी भिवंडीत अव्वाच्या सव्वा बिल आकारते. मात्र लोकांना त्याबद्दल काहीच वाटत नाही. माझ्या भाषणाला ज्या टाळ्या वाजताहेत, तशीच एखादी टाळी टोरंट कंपनीच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या गालावर वाजवली असती, तर परिस्थिती बदलली असती, असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपा