शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

Maharashtra Election 2019: उद्धव ठाकरे म्हणतात, 124 जागांवर समाधान मानणे ही तडजोड नाहीच, तर...    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 09:30 IST

युतीच्या जागावाटपात शिवसेनेला अवघ्या 124 जागा मिळाल्याने शिवसेनेने तडजोड केली. शिवसेना झुकली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र...

ठळक मुद्देयुतीच्या जागावाटपात शिवसेनेला अवघ्या 124 जागाशिवसेनेने तडजोड केली. शिवसेना झुकली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा 124 जागा हा आकडा शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा असला तरी त्याबरोबरच शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची सुरुवात करणारा हा पहिला आकडा असेल

मुंबई -  विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये अखेरच्या क्षणी युती झाली होती. मात्र युतीच्या जागावाटपात शिवसेनेला अवघ्या 124 जागा मिळाल्याने शिवसेनेने तडजोड केली. शिवसेना झुकली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र 124 जागा हा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतच्या इतिहासात लढवलेला सर्वात कमी आकडा असला तरी यावेळपासून शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार जिंकण्यास सुरुवात होईल, असा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली विशेष मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये  आज प्रसिद्ध झाली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी झालेली युती, जागावाटपात शिवसेनेने घेतलेली मवाळ भूमिका, शिवसेनेचं आगामी राजकारण आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सत्तेमध्ये मिळणारा वाटा अशा विषयांवर भाष्य केले.

यावेळी शिवसेनेने 124 जागांवर तडजोड का केली, अशी विचारणा केली असता, उद्धव ठाकरे यांनी जागावाटपात  झुकती भूमिका घेतल्याचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, ''आम्ही 124 जागांवर तडजोड केलेली नाही. आमची अडचण समजून घ्यावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे सातत्याने करत होते. दरम्यान ही अडचण मी समजून घेतली.'' मात्र 124 जागा हा शिवसेनेने आतापर्यंतच्या इतिहासात विधानसभेला लढवलेला सर्वात कमी आकडा आहे, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांना केला असता त्यांनी सांगितले की, 124 जागा हा आकडा शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा असला तरी त्याबरोबरच शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची सुरुवात करणारा हा पहिला आकडा असेल. सर्वाधिक आमदार निवडून आणण्याच्या मोहिमेची सुरुवात या आकड्यापासून होईल.'' दरम्यान, शिवसेनेचे अधिकाधिक आमदार निवडून यावेत या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. शिवसेनाप्रमुख सांगायचे की, वादळ आलं की, आपण शांत उभं राहायचं असतं. वादळामध्ये सगळे पाल्यापाचोळ्यासारखे उडून जातात. मात्र मी वादळामध्ये माशी शिवसेना वाढवून दाखवणार. इतर पक्ष उखडून फेकले जात असताना शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजवून दाखवणार, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. 

...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा 

'अब्जाधिश' असलेला प्रकाश आंबेडकरांचा 'वंचित' उमदेवार 

सर्वोच्च न्यायालयाने घेतली आरेतील वृक्षतोडीची दखल, आज सुनावणी 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019