सर्वोच्च न्यायालयाने घेतली आरेतील वृक्षतोडीची दखल, आज सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 08:03 AM2019-10-07T08:03:24+5:302019-10-07T08:08:31+5:30

 मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे.

Supreme Court acquiesces tree cutting in Aarey, hearing today | सर्वोच्च न्यायालयाने घेतली आरेतील वृक्षतोडीची दखल, आज सुनावणी 

सर्वोच्च न्यायालयाने घेतली आरेतील वृक्षतोडीची दखल, आज सुनावणी 

googlenewsNext

मुंबई/नवी दिल्ली -  मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. आरेमधील वृक्षतोडीकडे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले असून, सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत सुमोटो याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले असून, या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.  
 
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरूच असून, या परिसरात नाकाबंदी आणि जमावबंदी कायम आहे. दरम्यान, विधि शाखेच्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे आरेमधील वृक्षतोडीकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या पत्राचे ज वृक्षतोडीबाबत नहित याचिकेत रूपांतर करण्यात आले आहे. आज या याचिकेवर सुनावणी होईल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष खंडपीठ स्थापन केले आहे. 

मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यात येऊ नये, अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्यानंतर रात्रीच प्रशासनाने वृक्षतोडीचे काम हाती घेतले. शनिवारी दिवसभर वृक्षतोड सुरू असतानाच, पोलिसांनी आरे कॉलनी परिसरात नाकाबंदीसह जमावबंदीचे आदेश दिले. शंभर आंदोलकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर २९ आंदोलकांना अटक केली होती. स्थानिकांनी अटक केलेल्या २९ आंदोलकांची सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यात येऊ नये, अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्यानंतर रात्रीच प्रशासनाने वृक्षतोडीचे काम हाती घेतले. शनिवारी दिवसभर वृक्षतोड सुरू असतानाच, पोलिसांनी आरे कॉलनी परिसरात नाकाबंदीसह जमावबंदीचे आदेश दिले. शंभर आंदोलकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर २९ आंदोलकांना अटक केली होती. 

स्थानिकांनी रविवारी गोरेगाव पूर्वेकडील रेल्वे स्थानकाबाहेर मानवी साखळी करून सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. पाच मिनिटाला एक झाड असा वृक्षतोडणीचा वेग होता. शनिवारी रात्रीपर्यंत २,१८५ झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. एमएमआरडीएकडून मेट्रोचे १४ प्रकल्प राबविले जाणार आहेत. 

अश्विनी भिडे यांचे पुन्हा ट्विट
‘जीवनचक्र प्रवाही असते. ते एका ठिकाणी थांबत नाही. सृजनाची चाहूल पुन्हा-पुन्हा लागत राहते. नवीन पालवी फुटत राहते. नवनिर्मिती होत राहते,’ असे ट्विट एमएमआरसीच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी केले आहे, तर एमएमआरसीने एक नवीन व्हिडीओ ट्विट केले. एमएमआरसीने मुंबई व आरे परिसरात २४ हजार वृक्षांची लागवड केल्याची माहिती त्यात दिली आहे. 
 

Web Title: Supreme Court acquiesces tree cutting in Aarey, hearing today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.