Maharashtra Election 2019: ...मग पवार कुुटुंबात सगळं आलबेल कसं असेल?; राष्ट्रवादीच्याच एकेकाळच्या 'खास' नेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:19 IST2019-10-11T14:12:23+5:302019-10-11T14:19:10+5:30
Maharashtra Election 2019: 'पवारांच्या घरात काहीतरी चाललंय, अमकं चाललय, तमकं चाललय. हे इकडं ते तिकडं लोकसभेत

Maharashtra Election 2019: ...मग पवार कुुटुंबात सगळं आलबेल कसं असेल?; राष्ट्रवादीच्याच एकेकाळच्या 'खास' नेत्याचा टोला
मुंबई - राष्ट्रवादीचे गटनेते आणि माजी मंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा केला. अचानक राजीनामा दिल्यामुळे पक्षातील सर्वांनाच वेदना झाल्या, गोंधळ उडाला. ही माझी चूक होती की नव्हती हे मला माहिती नाही. पण, मी सर्वांची, कार्यकर्त्यांचीही माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असे अजित पवार यांनी म्हटले. आमच्या घरात कुठलाही गृहकलह नाही, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले होते. मात्र, आमदार सुरशे धस यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना, पवार कुटुंबीयांतील कलहावर भाष्य केलंय.
'पवारांच्या घरात काहीतरी चाललंय, अमकं चाललय, तमकं चाललय. हे इकडं ते तिकडं लोकसभेत. कोण काय करतंय, असं काहीतरी बातम्या आल्या. पण, तरी आमच्यात तसं नाही, असं नाही. आमच्या घरात काही नाही हे सांगायची पाळीच का येते हे मला सांगावं, असे म्हणत भाजपा सुरेश धस यांनी पवारांच्या गृहकलह पुन्हा उकरून काढलाय. काहीतरी असल्याशिवाय असं सांगायची पाळी येते का? आमच्या घरात सगळं आलबेल आहे, असे पवारांकडून सांगण्यात येतं. पवारांनी अनेक जणांचे पुतणे आपल्या पक्षात घेतलेत, त्यामुळे त्यांच्यात तसंच काहीसं होतंय, असे म्हणत पवार कुटुंबातील गृहकलहावर धस यांनी टीका केली.
जयदत्त क्षीरसागर हे बीड मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांविरुद्ध राष्ट्रवादीकडून जयदत्त यांचे पुतणे संदीप क्षीरसागर उमेदवार आहेत. त्यामुळे काका-पुतण्यातील लढाईच्या प्रचारात बोलताना धस यांनी पवार कुटुंबातील काका-पुतण्याच्या गृहकलहाकडे लक्ष वेधले.