शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'अटल' शब्दात भाजपाला टोला; संजय राऊत पुन्हा बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 08:43 IST

शब्द वाजपेयींचे, टीका भाजपावर; संजय राऊत यांचा पुन्हा हल्लाबोल

मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊतभाजपावर दररोज हल्लाबोल करत आहेत. काल कवी दुष्यंत कुमार यांच्या शब्दातून भाजपावर निशाणा साधल्यानंतर आज राऊत यांनी भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी याबद्दलचे संकेत दिले होते.'आग्नेय परीक्षा की इस घड़ी में- आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें : ‘‘न दैन्यं न पलायनम्।’’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. अटलबिहारी वाजपेयींनी हे वाक्य म्हटलं होतं, त्याची आठवण राऊत यांनी भाजपाला करुन दिली आहे. न दैन्यं न पलायनम् हा गीतेमधला संदेश असल्याचं राऊत यांनी ट्विटच्या शेवटी म्हटलं आहे. कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है, असा या संदेशाचा अर्थ होतो. राऊत गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्ष टीका करत आहेत.  तत्पूर्वी काल संजय राऊत यांनी दुष्यंत कुमारांच्या शब्दांत भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला होता. तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं, या कवितेतून राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं होतं. याबद्दल त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दुष्यंत कुमार, बशीर बद्र हे कवी मला आवडतात. अटलजींनी केलेलं लिखाणदेखील मला आवडतं. आता पुढे माझ्या ट्विटमध्ये अटलजीदेखील येतील, असं राऊत म्हणाले होते. यानंतर आज त्यांनी अटलजींचे शब्द ट्विट केले. त्यातून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपावर हल्ला चढवला आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा