शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महाराष्ट्र निवडणूक 2019: पुन्हा टीकेला 'ऊत'; सकाळ होताच भाजपावर बरसले संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 09:38 IST

Maharashtra Election 2019 संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई: विधानसभेचा निकाल जाहीर होऊन जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्याप राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. आज शिवसेना, भाजपाच्या गोटात मोठ्या घडामोडी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांची बैठक घेणार आहेत. तर भाजपाचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत सतत भाजपाला लक्ष्य करत आहेत. सोशल मीडिया, सामनातील अग्रलेख, पत्रकार परिषदा यांच्या माध्यमातून राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. आज त्यांनी कवी दुष्यंत कुमार यांचा एक शेर ट्विट केला आहे. 'तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं,' असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. यामधून त्यांनी भाजपाला लक्ष्य केल्याची चर्चा आहे. काल सकाळीदेखील संजय राऊत यांनी एका ट्विटमधून भाजपावर निशाणा साधला होता. 'जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है,' असं ट्विट राऊत यांनी केलं होतं. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशी ठाम भूमिका राऊत यांनी घेतली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ते सतत भाजपावर तोफ डागत आहेत. संजय राऊत यांच्या टीकेमुळेच शिवसेना, भाजपामधील दरी वाढल्याचं भाजपाच्या काही नेत्यांनी म्हटलं होतं.गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष आज संपण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. भाजपानं दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय होऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आमदारांची बैठक होईल. या बैठकीत राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला सत्तावाटपाचा तिढा, भाजपासोबत वाटाघाटी करण्याबाबत आमदारांची भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यास त्याचे स्थानिक राजकारणावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम, भाजपाबाबत शिवसेना आमदारांची असलेली मतं याबाबत चर्चा होणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना