शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 16:50 IST

बहुमताचं गणित जुळवण्यात यश?; शिवसेना नेते-राज्यपालांच्या भेटीकडे राज्यांचं लक्ष

मुंबई: भाजपापासून दूर गेलेली शिवसेना लवकरच राज्यात लवकरच सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. सध्या याच पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते सकाळपासून राष्ट्रवादी, काँग्रेसच्या संपर्कात असल्यानं राज्यपालांच्या भेटीत नेमकं काय घडणार, त्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आज दिवसभर राजकीय वर्तुळात भेटीगाठी आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर थोड्याच वेळापूर्वी उद्धव यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं समजतं आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई सकाळपासून काँग्रेसच्या, तर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या संपर्कात होते. त्यामुळे राज्यात 'महाशिवआघाडी'चं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगानं सुरू असताना शिवसेना नेते थोड्याच वेळात राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीत नेमकं काय होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना या भेटीत बहुमताचा दावा करणार की राज्यपालांकडून अधिक वेळ मागून घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. भाजपाला राज्यपालांनी ७२ तासांचा अवधी दिला होता. त्या तुलनेत शिवसेनेला अतिशय कमी वेळ मिळाल्याचं आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना