शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 11:42 IST

कणकवलीत नितेश राणेंविरोधात शिवसेना मैदानात

मुंबई: शिवसेनेच्या इतिहासात अनेक नेते पक्ष सोडून गेले. मात्र त्यातल्या नारायण राणे आणि ठाकरे कुटुंबाचं वैर कित्येक वर्ष टिकलं. आजही या दोन कुटुंबांमधील शत्रुत्व कायम आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबाची पुढची पिढी राजकारणात सक्रीय झाल्यानंतरही या दोन्ही कुटुंबातील वाद तसाच आहे. ठाकरे आणि राणे यांनी अनेकदा एकमेकांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. आता नारायण राणे आणि त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे भाजपात गेले आहेत. त्यामुळे ठाकरे आणि राणे कुटुंबातील वाद संपुष्टात येईल अशी चर्चा सुरू होती. भाजपा आणि शिवसेनेची युती असल्यानं मी शिवसेनेच्या उमेदवाराचादेखील प्रचार करेन, असं थोड्याच दिवसांपूर्वी नितेश राणेंनी म्हटलं होतं. मात्र संकट काळात माझ्यासोबत राहिलेल्या शिवसैनिकांना मी वाऱ्यावर सोडणार नाही, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलं. कोकणात एका मतदारसंघात नितेश राणे यांच्यासंदर्भात शिवसेनेकडून एका अधिकृत उमेदवाराला 'एबी' फॉर्म दिला आहे. त्याचं काय, असा सवाल उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील. एकही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही. काही उत्तरांना थोडासा वेळ लागेल, असं उत्तर उद्धव यांनी दिलं. उद्धव यांनी दिलेल्या उत्तरावर त्यांना म्हणजे संघर्ष कायम राहणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संकट काळात जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिला, माझ्यासाठी म्हणून उभा राहिला. शिवसेनेसाठी उभा राहिला तो मला मोलाचा आहे आणि म्हणून प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता देऊ शकत नाही. दोन-तीन दिवसांत मिळतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.राज्यभरात भाजपा-शिवसेनेची युती असताना तळकोकणात मात्र एकाच मतदारसंघात दोन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नारायण राणेंचा मुलगा आणि माजी आमदार नितेश राणे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच भाजपात प्रवेश केला. तर त्याचवेळी भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्या दिवशी नारायण राणेंचे उजवे हात समजले जाणारे सतीश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यामुळे पारकर यांनी माघार घेत सावंत यांनाच युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करून टाकले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे