शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: महायुतीमधील जागावाटपावर उद्धव ठाकरेंचं सूचक भाष्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 15:41 IST

भाजपानं मित्रपक्षांना दिलेल्या वागणुकीवर उद्धव ठाकरेंचा प्रतिक्रिया

मुंबई: महायुतीमधील जागावाटपाचं गुऱ्हाळ बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं. शिवसेनेनं निम्म्या जागांचा आग्रह धरला होता. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाकडून शिवसेनेला तसा शब्ददेखील देण्यात आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी भाजपानं शब्द फिरवला. याशिवाय महायुतीमधील अन्य लहान मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे त्या पक्षांचं अस्तित्वच धोक्यात येणार आहे. भाजपानं मित्रपक्षांना दिलेल्या वागणुकीवर उद्धव ठाकरे अतिशय सूचक भाष्य केलं.आम्ही मित्रपक्षांसाठी जागा सोडलेल्या आहेत. आता त्यांना काय जागा दाखवायची, ते भाजपानं ठरवावं, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं. भाजपानं महायुतीमधील लहान मित्रपक्षांना १८ जागा सोडल्या आहेत. मात्र त्या सर्व जागा त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढवाव्यात अशी अट घालण्यात आली आहे. मित्रपक्षांना काय जागा दाखवायची, ते भाजपानं ठरवावं, असं उद्धव यांनी म्हटलं. मित्रपक्षांना जागा दाखवावी म्हणजे त्यांना कोणकोणत्या जागा द्यायच्या आहेत ते पाहावं, असं लगेचच ते पुढे म्हणाले.यावेळी उद्धव ठाकरेंना आरेतील वृक्षतोडीबद्दलदेखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या विषयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन योग्य वेळी बोलू, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. आरेचा विषय सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं ते लवकरच ठरवू. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक बोलू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. उद्धव यांनी आज धनगर, कुणबी, तेली, वंजारी समाजाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा