शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून निघाले; 17 नोव्हेंबरला मुंबईत परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 22:54 IST

आमदारांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश

मुंबई: गेल्या आठवड्यापासून हॉटेल रिट्रीटमध्ये असलेल्या आमदारांना मतदारसंघात जाण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगानं सुरू असल्यानं शिवसेनेनं त्यांच्या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवलं होतं. मात्र आता शिवसेनेचे आमदार त्यांच्या मतदारसंघात निघाले आहेत. या आमदारांना १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १७ तारखेला बाळासाहेबांचा सातवा स्मृतिदिन आहे.राज्यात सत्ता संघर्ष तीव्र झाल्यानंतर शिवसेनेनं सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर आमदारांचा मुक्काम रिट्रीट हॉटेलमध्ये हलवण्यात आला. आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं होतं. मात्र भाजपा, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलादेखील बहुमताचा दावा करण्यात अपयश आलं. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं आमदारांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले. भाजपाकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र याचवेळी शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. तरीही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये ठेवलं. दरम्यान घोडेबाजाराचा आरोप भाजपानं फेटाळून लावला. आमदार फोडणं आमची संस्कृती नाही. ते नैतिकतेला धरुन नाही, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस