शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:08 IST

राष्ट्रीय मुद्दे वेगळे असतात पण राज्यातील निवडणुकीतले मुद्दे वेगळे असतात.

मुंबई- विधानसभा निवडणुकांच्या मतदानात घटलेली टक्केवारीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजकीय नेत्यांच्या प्रचार मुद्द्यांवर टीका केली आहे. ५० टक्क्यांहून अधिक लोक मतदान करु इच्छित नाही, लोकांच्या मनातील जे मुद्दे आहेत ते लोकांना भिडत नाही. लोकांच्या खऱ्या समस्या वेगळ्या आहेत आणि राजकीय नेते वेगळे मुद्दे मांडत आहेत. त्यावर लोकांचा विश्वास नाही.  मतदानाची टक्केवारी कमी होत चालली आहे ती संसदीय लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

तर राष्ट्रीय मुद्दे वेगळे असतात पण राज्यातील निवडणुकीतले मुद्दे वेगळे असतात. राज्यातील मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा या प्रत्येक निवडणुका वेगवेगळ्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका असतील तर गरिबी, भ्रष्टाचार, पाकिस्तान, समान नागरी कायदा, कुपोषण, तिहेरी तलाक, राष्ट्रीय सुरक्षा असे मुद्दे असतात असं संजय राऊतांनी सांगितले. तसेच राज्याच्या निवडणुकीत दुष्काळ, महागाई, बेरोजगारी असे विविध मुद्दे असतात. यामध्ये राजकीय नेते गफलत करत आहे.

राज्याच्या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा उचलून काय होणार? राम मंदिर, पाकिस्तान यावर लोकसभेत लोकांनी मतदान केले, यावर मतदारांनी युतीला निवडून दिलं. पण विधानसभेचे मुद्दे वेगळे आहेत असं सांगत संजय राऊतांनी एकप्रकारे भाजपाच्या प्रचारावर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपाचे दिल्लीतील सगळे नेते प्रचाराला आले होते. या निवडणुकीत भाजपाकडून कलम ३७० चा मुद्दा रेटून नेट्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर विरोधकांनीही कलम ३७० चा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध? असा प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यभरात ९ ते १० सभा झाल्या. या सर्व सभांमध्ये मोदींनी कलम ३७० हटविल्याचा उल्लेख केला. गृहमंत्री अमित शहांनीही प्रत्येक सभेत कलम ३७० हटविल्यामुळे जम्मू काश्मीर भारतात आलं हे स्वप्न पूर्ण झालं असा उल्लेख करत होते. त्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांमुळे राज्यातील विविध प्रश्न झाकले गेले. याचाच कुठेतरी फटका मतदानाच्या टक्केवारी झाला असेल असं अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाArticle 370कलम 370Pakistanपाकिस्तानMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा