शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटणार? भाजपा नेते राज्यपालांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 08:43 IST

Maharashtra Election 2019 सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता

मुंबई: जवळपास दोन आठवड्यांपासून शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला सत्ता वाटपाचा संघर्ष आज संपण्याची चिन्हं आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. या संघर्षाला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुपारी 2 वाजता भाजपा नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.दोन आठवड्यांपूर्वी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला. मात्र सत्तापदांच्या वाटपावरून शिवसेना, भाजपामध्ये संघर्ष निर्माण झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला हा संघर्ष आज संपण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. भाजपानं दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय होऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आमदारांची बैठक होईल. या बैठकीत राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला सत्तावाटपाचा तिढा, भाजपासोबत वाटाघाटी करण्याबाबत आमदारांची भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यास त्याचे स्थानिक राजकारणावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम, भाजपाबाबत शिवसेना आमदारांची असलेली मतं याबाबत चर्चा होणार आहे. शिवसेनेसोबतच भाजपाच्या गोटातही वेगवान हालचाली सुरू आहेत. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांची भेट घेणार आहेत. यासाठी त्यांनी दुपारी 2ची वेळ मागितली आहे. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. यानंतर भाजपा नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. या सर्व घडामोडी पाहता सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबरपासून निर्माण झालेली राजकीय कोंडी आज फुटू शकते.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे