शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
5
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
6
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
7
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
8
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
9
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
10
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
11
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
13
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
14
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
15
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
16
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
17
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
18
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
19
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवलेवाडीत घड्याळाला दिलेले मत कमळाला? निवडणूक अधिकारी म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:35 IST

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी नवलेवाडीत मतदान सुरु होते.

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारी मतदान पार पडले, मात्र साताऱ्यातील खटाव तालुक्यातील नवलेवाडी या मतदारसंघात घड्याळाला दिलेलं मतदान कमळाला होत असल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. मात्र या संपूर्ण प्रकरणात काही तथ्य नाही अशी कोणतीही घटना घडली नाही असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती नलावडे यांनी दिलं आहे. 

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी नवलेवाडीत मतदान सुरु होते. यावेळी सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी उमेदवारांचे प्रतिनिधी दिपक पवार आणि दिलीप वाघ यांनी हे मतदानापूर्वी उपस्थित होते. अभिरुप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. इतकचं नाही तर सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती त्यावेळीही कोणत्याही मतदारांनी आक्षेप घेतला नाही. मात्र त्यानंतर दिपक पवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्ष यांनी चाचणी मतदानांसाठी जोडपत्र १५ भरुण देण्याची सूचना केली मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. 

कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मॉक ड्रीलवेळी ईव्हीएम चांगले होते. मात्र, सकाळी 10-11 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएममध्ये घडाळ्याचे बटन दाबले असता कमळाचे म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, यामागची माहिती जाणून घेतली असता खरे सत्य समोर आले.

सकाळी 10 च्या सुमारास या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला. यामुळे मतदान करताना एरर दाखवू लागले. वरचे किंवा खालच्या बाजुचे कुठलेही बटन दाबले जात असता ते दाबलेच जात नव्हते. याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकाराची माहिती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना लागली. ईव्हीएममध्ये बिघाड की कमळाला मतदान होते याची चाचपणीही त्यांनी केली आणि खरा प्रकार समोर आला.

योगायोगाने शिंदे यांच्या मुलाच्या कारचा चालक नवलेवाडीचा रहिवासी होता. यामुळे शिंदे यांच्या मुलाने मतदान केंद्रावर जाऊन मशीनची पाहणी केली. यावेळी कोणतेच बटन दाबले जात नसल्याचे दिसून आले. शेवटी हे मशीन त्यांच्यासमोरच रिस्टार्ट करण्यात आले आणि मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. यामुळे या मशीनच्या बिघाडाची किंवा तक्रारीची कोणतीच नोंद झाली नाही. मात्र, सकाळपर्यंत घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची अफवा राज्यभरात पसरली होती.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग