शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Maharashtra Election 2019 : '370'चा महाराष्ट्राशी संबंध काय विचारणाऱ्यांनो, 'डुब मरो'; मोदींचा पवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:44 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम 370 वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे.

अकोला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम 370 वरून शरद पवारांसह  विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. कलम 370 हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम 370 चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज अकोला येथे झाली यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ''कलम 370 शी महाराष्ट्राशी देणंघेणं नाही, असं म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. अशा लोकांनी कान उघडून उघडा की,  जम्मू काश्मीर आणि तेथील जनता ही भारतमातेचीच लेकरे आहेत. आज संपूर्ण देश एक होऊन काश्मीरच्या मागे उभा आहे. देशाच्या रक्षणासाठी या शिवरांयांच्या भूमीतील मावळे हौतात्म्य पत्करत आहेत. आणि तुम्ही कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबंध म्हणून विचारणा करता.'' असे मोदी म्हणाले. 

मतांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा फार नुकसान झाले असेही त्यांनी सांगितले.''मतांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे. एकेकाळी महाराष्ट्रात बॉम्बस्फोट व्हायचे. मुंबईत, ट्रेन, बस, महत्त्वाच्या इमारतींमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे. पण याबाबत ज्या लोकांकडे संशयाची सुई गेली ते देश सोडून पळाले. त्यांनी शत्रू राष्ट्रांत बस्तान बसवले. हे कसे झाले. एवढे मोठे गुन्हेगार देशाबाहेर कसे काय पळाले,''असा सवालही मोदींनी शरद पवार आणि अन्य नेत्यांचं नाव न घेता उपस्थित केला.यावेळी सरकारी संस्थांवर टीका करणाऱ्यांवरही मोदींनी टीका केली. अनेक भ्रष्टाचाऱ्यांचे एक ना एक दिवस पितळ उघड पडणार होतं. त्यामुळे जनतेला उत्तर द्यावं लागेल याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी खोट्याची मदत घेऊन विविध संस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. संकट आलं की खोट्याची मदत होईल असं वाटलं होतं. पण वेळ बदलली आहे. तुमच्या प्रत्येक कृतीचा जाब देश विचारल्याशिवार राहणार नाही, असा टोलाही मोदींनी लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या भ्रष्टवादी युतीने राज्याला अनेक वर्षे मागे लोटले अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.   

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370BJPभाजपा