शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 15:05 IST

बीडमध्ये अमित शहांचा काश्मीर राग

बीड: तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ३०० खासदारांचं बळ दिलं. त्यांनी अवघ्या ५ महिन्यांत काश्मीरमधील कलम ३७० हटवलं, असं म्हणत भाजपा अध्यक्ष अमित शहांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. पंतप्रधान मोदी गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मार्गी लावत असल्याचंदेखील ते म्हणाले. ते बीडमधील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी अमित शहांनी मोदी सरकारच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'भगवानबाबांनी समाजासाठी आयुष्य वेचलं. त्यांनी समाजाला शिक्षणाचा संदेश दिला. शिक्षणातून आयुष्याला दिशा मिळू शकते, याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. त्याओबीसी, वंचितांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेलं काम अतिशय मोठं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे भगवानबाबांच्या विचारांनी जगले. त्यांनी ऊसतोड कामगार, मजुरांचे प्रश्न मार्गी लावले. आता त्यांच्या कन्या पंकजा मुंडेदेखील त्याच मार्गानं वाटचाल करत आहेत,' असं शहा म्हणाले. सत्तर वर्ष सत्तेत असलेल्या पक्षानं ओबीसींसाठी काय केलं, असा सवाल शहा यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींचं सरकार वंचितांसाठी काम करत आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये मार्गी लावल्याचंदेखील शहा म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा