शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Maharashtra Election 2019: जाहीरनामा काढणार नाही तर फाडणार; राज ठाकरेंची भाजपा- शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 13:21 IST

Maharashtra Election 2019: शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती.

शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती. सरकारने 5 वर्षात दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत आणि आता सत्तेत येण्यासाठी पुन्हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मला एकाने विचारलं की मनसेचं जाहीनाम्याचं कायं मी त्याला म्हणलं मी जाहीरनामा काढणार नाही तर विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा फाडणार असं म्हणत मनसेप्रमुखराज ठाकरेंनी भाजपा व शिवसेनेने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपने तिकिटं दिली, मग काय बदल झाला? काय बदल होणार आहे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचप्रमाणे नोटबंदीसारख्या निर्णयामुळे आज देशभरात मंदी आली आहे. हे आर्थिक मंदीचे दिवस कुणामुळे आले? त्यात भाजपाचे कायदामंत्री रवीशंकर प्रसाद म्हणतात 'हिंदी चित्रपट कोट्यवधी कमावतात म्हणजे मंदी नाही.' मग देशातले सर्व उद्योगधंदे बंद होत आहेत, ह्याला काय म्हणतात? हजारो तरुण बेरोजगार होत आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. यवतमाळमधील वणी मतदारसंघातील प्रचारसभेत ते बोलत होते.

दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे असं भाजपाने जाहिरनाम्यात लिहिलं होतं. या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या कशा वाढल्या? गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच  ज्यांनी बँका बुडवल्या ते मजेत आहे, पूल कोसळले माणसं मेली, या गोष्टींचा राग येत नाही, 5 वर्षापूर्वी यांनी काय सांगितले, किती गोष्टी केल्या याबाबत कोणीही विचारणा केली नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्याचं भाषण होण्यापूर्वी बाजूच्या गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yavatmal-acयवतमाळ