शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: ...म्हणून बीएमडब्ल्यूचा कारखाना महाराष्ट्रातून गेला; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 21:12 IST

मराठी अस्मितेवर भाष्य; विलासराव देशमुख सरकारच्या काळातील घटनेचं उदाहरण

पुणे: आपल्याला आपल्या भाषेचा अभिमानच वाटत नाही. मराठीबद्दल आम्हाला ममत्वच नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी पुण्यातील प्रचारसभेत म्हटलं. भाषिक अस्मितेवर बोलताना राज यांनी दाक्षिणात्य राज्याचं उदाहरण दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना घडलेली एक घटना राज यांनी यावेळी सांगितली. ते पुण्यातील कसब्यात बोलत होते. Maharashtra Assembly Election 2019 : 'चंपा'ची 'चंपी करणार, पुण्यात राज ठाकरेंचा भाजपाला 'मनसे' टोलाविलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यात बीएमडब्ल्यूचा कारखाना येणार होता. मात्र हा कारखाना महाराष्ट्रात आला नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 'विलासराव मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यूला राज्यात कारखाना सुरू करायचा होता. त्याचवेळी मर्सिडिजनं महाराष्ट्रात कारखाना सुरू केला होता. बीएमडब्ल्यू प्रकरणात विलासरावांनी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या एका दाक्षिणात्य अधिकाऱ्याला लक्ष घालायला सांगितलं. यानंतर बीएमडब्ल्यूचे काही उच्चपदस्थ अधिकारी त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्याला भेटायला आले. मात्र त्यानं कंपनीला आवश्यक गोष्टी पुरवण्यास नकार दिला,' असं राज ठाकरेंनी सांगितलं.Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार दिसली नसती- राज ठाकरे'कंपनीच्या अधिकाऱ्यांना दाक्षिणात्य अधिकाऱ्यानं कारखान्यासाठी आवश्यक गोष्टींबद्दल विचारणा केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्या अधिकाऱ्याला सांगितल्या. मात्र कंपनीची एकही मागणी पूर्ण होऊ शकत नसल्याचं दाक्षिणात्य अधिकाऱ्यानं बैठकीत म्हटलं. त्यानंतर कंपनीची मंडळी निघून गेली. ती माणसं निघून जाताच दाक्षिणात्य अधिकाऱ्यानं त्याच्याच बॅचमधल्या एका अधिकाऱ्याला फोन केला. तो अधिकारी तामिळनाडूत कार्यरत होता. मी आता बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना कारखान्यासाठी नकार दिला आहे. तू त्यांना तातडीनं फोन कर आणि तो कारखाना तुमच्याकडे घे. याला म्हणतात आपल्या राज्यावरचं प्रेम,' असा किस्सा राज यांनी सांगितला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेBmwबीएमडब्ल्यू