शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

Maharashtra election 2019 : वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढायला मागेपुढे पाहणार नाही : शरद पवारांनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 17:06 IST

Maharashtra election 2019 : त्यांना सांगा जोपर्यंत ते सरळ आहे तोपर्यंत मी सरळ आहे..

ठळक मुद्देइंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ सभा

बारामती : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला जातो, असं माझ्या कानावर आलंय. त्यांना सांगा जोपर्यंत ते सरळ आहेत तोपर्यंत मी सरळ आहे. त्यांनी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढायला मागपुढं पाहणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले.इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या सांगता सभेमध्ये शनिवारी (दि. १९) पवार बोलत होते. यावेळी माजीमंत्री व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना लक्ष करीत पवार म्हणाले, माझी चर्चा दत्तात्रय भरणे यांच्याशी झाली होती. मतदार संघात वाद नको म्हणून ते थांबायला तयार होते. ही चर्चा झाल्यानंतर मी हर्षवर्धन पाटील यांना आठवेळा फोन केला मात्र त्यांनी घेतला नाही. शेवटी त्यांच्या कन्येशी संपर्क करून झालेली चर्चा हर्षवर्धन यांच्या कानावर घाला, असे सांगितले मात्र त्यांचे उत्तर आले नाही. आमच्यावर अन्याय झाला असे सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जे घराणं काँग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक राहिले. काँग्रेसच्या तत्त्वांनी स्वर्गिय शंकरराव पाटील यांनी राजकारण केले. मात्र तत्व कधी सोडले नाही. त्या शंकरराव भाऊंना वर काय वाटत असले, अशा शब्दात पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टिका केली. शेवटी पवार म्हणाले, २० वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात तालुक्यात विकासकामे केली असती तर हर्षवर्धन यांच्यावर ही वेळ आली नसती. दत्तामामांनी पाच वर्षात १३०० कोटींचा निधी मतदार संघामध्ये आणून आपण कामाचा माणूस आहोत हे दाखवले आहे.———————————

 

टॅग्स :Indapurइंदापूरindapur-acइंदापूरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक