Maharashtra Election 2019: सामान्य नागपूरकर शरद पवारांना गुंड वाटू लागला आहे: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 17:56 IST2019-10-11T16:54:20+5:302019-10-11T17:56:06+5:30
Maharashtra Election 2019: राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले होते.

Maharashtra Election 2019: सामान्य नागपूरकर शरद पवारांना गुंड वाटू लागला आहे: देवेंद्र फडणवीस
राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले होते. यावर प्रत्येक नागपूरकर शरद पवारांना गुंड वाटू लागला असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांना नागपूरकर गुंड वाटू लागले असून एका मासामान्य नागपूरकारांनीच त्यांची अशी अवस्था करुन ठेवली असल्याचे सांगत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील प्रचारसभेत बोलत होते.
राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य शरद पवारांनी नागपूरच्या प्रचारसभेत केलं होतं. तसेच नागपूरचे प्रतिनिधित्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याने नागपूरातच त्यांना गुन्हा थांबवण्यात अपयश येत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांनी टीका केली होती.