शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:48 IST

ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केलं होत. तर एमआयएमने अचानक चर्चा थांबवली आणि त्यांनतर युती तुटल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र आता युती तुटण्याचे खरे कारण समोर आले आहे. एमआयएमकडे असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघावर वंचितने दावा केल्याने युती तुटल्याचा गौप्यस्फोट खुद्द एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. वंचित आघडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सद्या औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाच्या प्रचारसाठी आले आहेत. तर याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे काही नेत्यांनी ओवेसी यांची भेट घेत, युती तुटल्याचा मुद्द्यावरून चर्चा केली. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आपण विनंती करा असेही ओवेसी यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे एमआयएमची विद्यमान जागा वंचितला सोडण्याची मागणी करत आहे. परंतु मी माझी विद्यमान जागा कशी सोडणार, असा प्रश्न सुद्धा ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला. तर आंबेडकर यांच्यासाठी आम्ही औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ सोडायला तयार झालो होतो. मात्र ते 'मध्य'वर अडवून बसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे ओवेसी म्हणाले.

प्रत्यक्षात मध्य मतदारसंघातून २०१४ ला इम्तियाज जलील हे निवडून आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या युतीत या मतदारसंघावर एमआयएमचा नैसर्गिक अधिकार होता. त्यामुळे आंबेडकर यांची मागणी अवाजवी असल्याचे आता बोलले जात आहे. तर एमआयएमचा ताब्यात असलेल्या एका मतदारसंघासाठी आंबेडकर यांनी युती तोडली असावी का ? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.